- March 7, 2024
- No Comment
बावधन परिसरात महिलेचा गळ्यावर वार करून खून
बावधन परिसरात एका महिलेच्या गळ्यावर वार करून खून केल्याची घटना रात्री उशिरा उघडकीस आली. खळबळजनक बाब म्हणजे महिलेचा पतीही गंभीर जखमी झाला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा महेंद्र जैन नावाच्या महिलेची हत्या करण्यात आली आहे. या घटनेत तिचा पती महेंद्रही जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन येथील विंड विल सोसायटीत आशा पती महेंद्र, मुलगी आणि जावयासह राहत होती. तिथे त्यांचा बंगला आहे. बुधवारी सकाळी आशा यांच्या मुलीला आशा बेडरूममध्ये मृतावस्थेत पडलेली दिसली, तर महेंद्र जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी तातडीने महेंद्रला रुग्णालयात दाखल केले. महेंद्रने आधी आशाची हत्या केली आणि नंतर आत्महत्येचा प्रयत्न केला, असा पोलिसांचा संशय आहे. सध्या ते जबाब नोंदवण्याच्या स्थितीत नाहीत. त्याच्या चौकशीनंतरच घटना स्पष्ट होईल.