- March 7, 2024
- No Comment
देहूरोड परिसरात ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाच्या मुलाची निर्घृण हत्या:चार जणांना अटक
पुणे : पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. देहूरोड परिसरात ही घटना घडली आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटप्रमुख विजय थोरी यांच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे आणि थोरी कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली आहे
शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटप्रमुख विजय थोरी यांचा 23 वर्षीय मुलगा विशाल हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्यावेळी त्याचा आणि आरोपींचा वाद झाला. आरोपी कपड्याचे दुकान बंद असताना हा प्रकार घडला. त्यानंतर मध्यरात्री एक वाजता ते पुन्हा एकमेकांसमोर आले. त्यावेळी सिमेंटचे गट्टू, कुंडी आणि लाकडी बाबूंने मारहाण केली. यात विशालचा मृत्यू झाला. मुख्य आरोपी आणि विशालचे आधीपासूनच वाद होते. अशी माहिती देहूरोड पोलिसांनी दिली असून चार जणांना अटक ही करण्यात आली आहे.