• March 6, 2024
  • No Comment

मैत्रिणीला मॉडेलिंगसाठी नेल्याने सराइताचे तरुणावर कोयत्याने वार

मैत्रिणीला मॉडेलिंगसाठी नेल्याने सराइताचे तरुणावर कोयत्याने वार

    पुणे : मैत्रिणीला मॉडेलिंगसाठी नेल्याने सराइताने एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना टिळक रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी सराइतासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

    याप्रकरणी ओम गायकवाड, त्याचे साथीदार आनंद, रोहन, सुमीत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेदांत राजकुमार शिंदे (वय १९, रा. लोहियानगर, गंज पेठ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गायकवाड सराइत आहे. गायकवाडच्या मैत्रिणीला वेदांतने मॉडेलिंगसाठी नेले होते. त्यामुळे गायकवाड वेदांतवर चिडला होता

    मंगळवारी सायंकाळी आरोपी गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी वेदांतला टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय परिसरात गाठले. त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन चौघे जण पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे तपास करत आहेत.

    Related post

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर गुंजाळ यास जिल्हा व सत्र न्यायालय यांच्याकडून अटकपूर्व जामीन मंजूर

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर…

    पुणे :- येरवडा परिसरात दहशत माजवुन रात्रीच्या वेळेस बर्थ-डे केक भर चौकात सिंघम गाण्यावर कापला. सदररील बातमी प्रसिध्द झाल्यानंतर पोलीसांची कारवाई…
    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

    पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *