• March 4, 2024
  • No Comment

वाघोली येथे बहिणीच्या प्रियकरावर असलेल्या रागामधून स्कूल व्हॅन चालक तरूणावर कोयत्याने हल्ला

वाघोली येथे बहिणीच्या प्रियकरावर असलेल्या रागामधून स्कूल व्हॅन चालक तरूणावर कोयत्याने हल्ला

    पुणे : बहिणीच्या प्रियकरावर असलेल्या रागामधून एका अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराने स्कूल व्हॅन चालक तरूणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना वाघोली येथे घडली. विशेष म्हणजे हल्ला झाला त्यावेळी हा तरुण शाळेच्या मुलांना स्कूल व्हॅनमधून घेऊन जात होता. गाडीमध्ये शाळेची मुले असताना देखील हल्लेखोरांनी गाडीच्या काचांवर आणि दरवाजावर
    कोयत्याने घाव घालत हल्ला चढवला. भेदरलेल्या शाळेच्या मुलांनी जिवाच्या आकांताने आरडाओरडा सुरू केल्यानंतर आरोपी पसार झाले. सुदैवाने या घटनेत शाळेचे विद्यार्थी जखमी झाले नाहीत.
    सचिन दिगंबर इंगवले (वय २७, गल्ली नंबर ०३, काळबाईनगर, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. लोणीकंद पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन हे त्यांची आई, पत्नी, लहान भाऊ आणि मुलासह राहण्यास आहेत. त्यांच्याकडे स्कूल व्हॅन असून ते वाघोली येथील बीजेएस कॉलेज या संस्थेच्या शाळेतील मुलांना शाळेत नेण्या-आणण्याचे काम करतात. त्यांच्या गाडीवर सहा वर्षांपूर्वी फिर्यादीच्या आत्याचा मुलगा मोहन राजाभाऊ कदम (रा. शिरसाळा, ता. परळी, बीड)
    हा चालक म्हणून काम करीत होता. तो वाघोली मधील दुबेनगर येथील एका मुलीला आणि तिच्या भावाला २०१९-२०२० मध्ये बीजेएस कॉलेज या संस्थेच्या शाळेत नेण्या-आणण्याचे काम करीत होता. त्यावेळी मोहन व त्या मुलीमध्ये प्रेमप्रकरणावरून वाद झाले होते. त्यानंतर, पिडीत मुलीने याबाबत मोहन विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात अपहरण आणि बलात्काराचा
    गुन्हा दाखल केला होता.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *