- March 4, 2024
- No Comment
उरुळीकांचन येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यास दोन हजाराची लाच स्विकारताना ACB च्या जाळ्यात
पुणे : सोरतापवाडी येथील जमिनीतील लाईटचा पोल स्थलांतरित करण्यासाठी उरुळीकांचन येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यास दोन हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई उरुळीकांचन पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे रजिस्टर सरकारी ठेकेदार असून, खाजगी जमीन मालक यांनी तक्रारदार यांना त्यांचे सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे येथील त्यांचे जमिनीतील लाईट पोल दुसरीकडे स्थलांतरित करण्याचे काम दिले होते. या कामाची फाईल मंजुरीकरीता लोकसेवक धम्मपाल पंडीत यांचेकडे प्रलंबित होती. ती फाईल मंजुर करण्यासाठी लोकसेवक धम्मपाल पंडीत यांनी तक्रारदार यांचेकडे २,०००/- रुपये लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली होती.
सदर तक्रारीची पडताळणी केली असता, दि. ०९/२/२०२४ रोजी लोकसेवक धम्मपाल पंडीत यांनी तक्रारदार यांचेकडे लाईट पोल दुसरीकडे स्थलांतरित करण्यास मंजुरी देणेसाठी २,०००/- रुपये लाच रक्कमेची मागणी करुन, आज दि. ०४/०३/२०२४ रोजी लोकसेवक धम्मपाल पंडीत यानी तक्रारदार यांचेकडून रक्कम रुपये २,०००/- लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्यावर त्याना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध ऊरुळी कांचन पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पुढील तपास लाचलुचपत.प्रतिबंधक.विभाग. पुणे येथील पोलीस निरीक्षक रुपेश जाधव तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागान केली.