- October 15, 2024
- No Comment
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर
पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजुर करण्यात आला आहे.
आरोपीने पोलीसांसमोर गुन्हा कबूली दिली व त्यानूसार निवेदन दिले होते, परंतु सदरील केस मध्ये आरोपीच्या विरूद्ध प्रथम दर्शनी पुरावा नसल्याकारणाने व इतर साक्षीदारांचे जबाबात विरोधाभास असल्याचे आरोपीच्या वकीलाने मांडले. आरोपीच्या बाजुने अँड नितीन कदम यांनी युक्तीवाद केला. त्यांचे समवेत अँड प्रशांत कुडचे,अक्षय म्हस्के, कलमेश लोखंडे, श्रद्धा जैन, गौरी सोनवणे, मयुरी थोरात यांनी कामकाज पाहीले.