• December 3, 2024
  • No Comment

स्वारगेट आणि हडपसर भागातील फुरसुंगीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेचा छापा

स्वारगेट आणि हडपसर भागातील फुरसुंगीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेचा छापा

    पुणे : स्वारगेट आणि हडपसर भागातील फुरसुंगीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी आठजणांविरुद्ध गन्हा दाखल केला. स्वारगेट परिसरातील सारसनगर सोसायटीजवळ पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळला जात असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे कारवाई केली. याप्रकरणी आयाज अफगाण शेख (वय ४०), गणेश भाऊसाहेब भोसले (वय ४८, दोघे रा. मंगळवार पेठ) , वसीम फारुख शेख (वय ४०, रा. कांतीपुरम सोसायटी, कसबा पेठ) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.


    हडपसर भागतील फुरसुंगीत पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाकला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे कारवाई केली. याप्रकरणी साईनाथ बाळासाहेब हरपळे (वय ३२, रा. भोसले व्हिलेज, फुरसुंगी), लखन तानाजी कासले (वय २६, रा. भेकराईनगर फुरसुंगी) यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

     

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *