• December 3, 2024
  • No Comment

पेट्रोल चोरीचा संशयवरून पुण्यातील नऱ्हे येथे एका २० वर्षीय तरुणाला उपसरपंचासह तिघांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

पेट्रोल चोरीचा संशयवरून  पुण्यातील नऱ्हे येथे एका २० वर्षीय तरुणाला उपसरपंचासह तिघांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

    पुणे : पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारी मुळे शुल्क कारणावरून गोष्ट जीवावर बेतली जात आहे. संघटित टोळ्यांना राजकीय नेत्यांच्या अभय मिळत असल्यामुळे पोलोस ही हातबल होतानाच चित्र दिसत आहे. २५ नोव्हेंबर रोजी पुण्यातल्या नऱ्हे येथे राहणाऱ्या तरुणाला पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून उपसरपंच आणि त्याच्या तीन साथीदारांनी बेदम मारहाण केली होती. त्याचा उपचारदरम्यान काल रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे मृत्यू व्यक्तीच्या कुटूंबनकडून हाळ हाळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी सिहगड रोड पोलिसांनी कारवाई करत तीन आरोपीना अटक केली आहे. तर उपसरपंच अद्यप फरार आहे

    समर्थ नेताजी भगत (वय: २० वर्षे, रा. व्यंकटेश्वरा सोसायटी,अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे, पुणे) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत नेताजी सोपान भगत यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    आरोपी गौरव संजय कुटे (वय: २४ वर्षे) अजिंक्य चंद्रकांत गांडले (वय: २० वर्षे) राहुल सोमनाथ लोहार (वय: २३ वर्षे, सर्व राहणार मानाजीनगर, नऱ्हे) या तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून माजी उपसरपंच सुशांत सुरेश कुटे हे सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील मानाजीनगर भागात २५ नोव्हेंबर रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास माजी उपसरपंच सुशांत कुटे यांच्या ऑफीससमोर फिर्यादी यांचा मुलगा समर्थ हा गाडीतील पेट्रोल संपल्याने ते दुसऱ्या गाडीतील पेट्रोल काढत असताना आरोपी गौरव संजय कुटे व त्याच्या इतर दोन ते तीन साथीदारांनी समर्थला चोर समजुन लाथा बुक्यांनी, काठीने तसेच सायकलच्या चैनने दोन्ही हातावर, पायावर, पार्श्व भागावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *