• December 3, 2024
  • No Comment

लाडकी बहीण योजनेतील पैशांचे वाटप सुरू असल्याचा नावाने महिलेला ८० हजार रुपयांचा गंडा

लाडकी बहीण योजनेतील पैशांचे वाटप सुरू असल्याचा नावाने महिलेला  ८० हजार रुपयांचा गंडा

    महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. या योजनेद्वारे राज्यातील महिलांना दर महिना १५०० रुपये दिले जातात. मात्र आता या योजनेमुळे एका ज्येष्ठ महिलेची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाडकी बहीण योजनेतील पैशांचे वाटप सुरू असल्याचे सांगत चोरट्याने त्या महिलेचे ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.
    पुण्यातील हडपसर भागात गुरुवारी एक धक्कादायक प्रकार घडला. गुरुवारी (२८ नोव्हेंबर) एका ज्येष्ठ महिलेने पुण्यातील हडपसर पोलिसात तक्रार दाखल केली. ही तक्रारदार ज्येष्ठ महिला हडपसर भागात राहायला आहेत. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास त्या हडपसरमधून निघाल्या. त्यावेळी एका चोरट्याने त्यांना अडवले. आमचे साहेब ला़डकी बहीण योजनेतंर्गत पाच हजार रुपयांचे वाटप करत आहे. यावेळी त्या चोरट्याने त्यांना बोलण्यात गुंतवले आणि त्यांना मंगळसूत्र आणि अंगठी काढून ठेवण्यास सांगितले. यानंतर त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधत चोरट्याने त्यांचे दागिने लंपास केले आणि तो पसार झाला.

     

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *