- December 3, 2024
- No Comment
वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून अल्पवयीन मुलीकडे शरिर सुखाची मागणी केल्याची घटना समोर २२ वर्षाच्या तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
पुणे: वाढदिवसानिमित्त अल्पवयीन मुलीला घरी नेण्याचा बहाणाकरून अज्ञात ठिकाणी नेहून बड्डे गिफ्ट म्हणून शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. परंतु मुलीने नकार दिल्याने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी १७ वर्षीयअल्पवयीन मुलीने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी २२ वर्षाच्या तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १४ जुलै २०२४ रोजी घडला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्याने मुलीला घरी घेऊन जातो, असे सांगितले. तसेच, घरी न घेऊन जाता तिला अज्ञात ठिकाणी एका बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये असलेल्या खोलीत नेले. तेथे आज माझा वाढदिवस आहे. तर मला तुझ्याकडून गिफ्ट पाहिजे, असे म्हणून तिच्याकडे शारीरीक सुखाची मागणी केली. तेव्हा तिने नकार दिला असता तरुणाने तिला मिठी मारुन तिचा विनयभंग केला. तसेच तुने इसके बारेमे किसको बताया, तो तेरा अब्बा मर जायेगा, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे तपास करीत आहे.