- December 3, 2024
- No Comment
स्पाच्या नावाखाली मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय एनआयबीएम रोडवरील आयरिन स्पावर छापा मॅनेजर व स्पा मालकाला अटक
पुणे : स्पाच्या नावाखाली मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याचा भंडाफोड अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने केला आहे. एनआयबीएम रोडवरील आयरिन स्पावर छापा घालून मॅनेजर व स्पा मालकाला अटक केली आहे.
मॅनेजर शिव राजेश भोसले (वय २१, रा. सैनिक विहार, एनआयबीएम पोस्ट ऑफीस रोड) आणि स्पा मालक निखील राजेंद्र नाईक (वय २६, रा. ग़्रीन पार्क सोसायटी, फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षाच्या सहायक पोलीस उपनिरीक्षक छाया जाधव यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी चार वाजता करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयबीएम रोडवरील आयरिन स्पा येथे पिडित मुलींना वेश्या व्यवसायाकरीता प्राप्त करुन त्यांना पैशांचे अमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठविले. त्याने खात्री करुन तसा पोलिसांना इशारा दिल्यानंतर पोलिसांनी आयरिन स्पावर छापा टाकला. स्पा च्या नावाखाली मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेऊन त्यातून मिळालेल्या रक्कमेतून स्वत:ची उपजिविका चालवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी मॅनेजर व स्पामालकाला अटक केली. त्यांच्याकडून ७६ हजार रुपयांचे तीन मोबाईल व रोख रक्कम जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक शेख तपास करीत आहेत