• December 3, 2024
  • No Comment

मित्राची चेस्टा का केली असे म्हणून डोक्यात कोयत्याने वार करुन तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

मित्राची चेस्टा का केली असे म्हणून डोक्यात कोयत्याने वार करुन तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

    पिंपरी : मित्रासोबत चेस्टा मस्करी करीत असताना मित्राची चेस्टा का केली असे म्हणून डोक्यात कोयत्याने वार करुन तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

    ओंकार नवनाथ आरवडे (वय २४, रा. जय योगेश्वर सोसायटी, कृष्णानगर, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सचिन दादासाहेब साळुंखे (वय १९, रा. साईनाथनगर, निगडी) याला अटक केली असून त्यांच्या दोन साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार निगडीतील आण्णाभाऊ साठे क्रीडा मैदानात शनिवारी रात्री पावणे आठ वाजता घडला.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार हे त्याचे मित्र यश पोतदार याच्यासोबत आण्णाभाऊ साठे क्रीडा मैदानात चेस्टा मस्करी करत थांबले होते. यावेळी सचिन साळुंखे व त्याचे दोन साथीदार तेथे आले. त्यांनी माझ्या मित्राची चेस्टा मस्करी का करतो, असे विचारुन ओंकार याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तू येथून निघून जा, नाही तर तुला जीवे मारीन, अशी धमकी दिली. सचिन साळुंखे याने त्याच्याकडील कोयत्याने ओंकारला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक यलमार तपास करीत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *