- October 30, 2022
- No Comment
अवैध गुटखा विक्री प्रकरणी अन्नसुरक्षा विभागाची कारवाई, आरोपी जेरबंद
बावधान: अन्नसुरक्षा विभागाने बावधन येथील नरेंद्र ट्रेडर्स येथे छापा मारून कारवाई केली. यामध्ये 23 हजारांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधीत सुपारी जप्त करण्यात आली आहे.
गोविंदराम जेपारामजी प्रजापती (वय 48, रा. बावधन खुर्द) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी सोपान इंगळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या नरेंद्र ट्रेडर्स या दुकानात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित सुपारी याचा विक्रीसाठी साठा करून ठेवला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आरोपी प्रजापती याच्या दुकानावर कारवाई करण्यात आली. त्यात आरोपीने 23 हजार 357 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटका आणि सुगंधित सुपारी यांचा विक्रीसाठी साठा करून ठेवला असल्याचे उघड झाले. हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.