• October 31, 2022
  • No Comment

बायको पळून जाण्याला हाच जबाबदार म्हणत शेजार्‍यस बेदम मारहाण

बायको पळून जाण्याला हाच जबाबदार म्हणत शेजार्‍यस बेदम मारहाण

खराडी: बायको पळून जाण्याला हाच जबाबदार आहे असा संशय मनात धरून एकाने तिघांसह शेजारी राहणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केली. खराडी परिसरात हा प्रकार घडला.

याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण तुकाराम रणपिसे (वय 32) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाची बायको फिर्यादीच्या मित्रासोबत पळून गेली आहे. फिर्यादीने त्या दोघांचे प्रेम संबंध जुळून दिले असावेत असा संशय पळून गेलेल्या पत्नीच्या पतीला होता. हाच राग मनात धरून तिघा जणांनी मिळून फिर्यादी यांना स्टीलच्या रॉडने मारहाण केली.

फिर्यादीची काही भांडणे सोडवण्यासाठी आली असता आरोपींनी तिला देखील मारहाण केली. या सर्व प्रकारानंतर फिर्यादी यांनी चंदन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे अधिक तपास करत आहेत.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *