- October 31, 2022
- No Comment
दरोडा व खुन करण्याच्या तयारीत असलेल्या अट्टल गुन्हेगार, पिस्टल, जिवंत काडतुसे व घातक शस्त्र आणि मुददेमालासंह गजाआड, युनिट -२ ची उल्लेखनिय कामगिरी
पुणे: सुपारीची रक्कम न मिळाल्याने, दरोडा व खुन करण्याच्या तयारीत असलेल्या अटटल गुन्हेगारांना, पिस्टल, जिवंत काडतुसे व घातक शस्त्र आणि मुददेमालासंह युनिट -२ कडून रंगेहात पकडण्यात आले आहे.
आबा ऊर्फ ज्ञानेश्वर फुलचंद तांदळे (वय २८ रा भोसरी पुणे), आदित्य गणपती राठोड (वय १९ रा पिंपरी चिंचवड पुणे), मंजय रामचंद्र प्रसाद ऊर्फ सहा (वय ४० रा काळभोर निगडी) अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दिवाळीचे अनुषंगाने भारती विदयापीठ पोलिस स्टेशनचे हददीमध्ये युनिट २ कडील अधिकारी व अंमलदार असे २५/१०/२०२२ रोजी गस्त घालत होते. पोलिस अंमलदार नामदेव रेणुसे व विजय पवार यांना बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, सुपारीची रक्कम न मिळाल्याने दरोडा व खुन करण्याचे तयारीत असलेले अटटल ४/५ आरोपी हे जवळ पिस्टल व घातक शस्त्रे बाळगुन चौगुले इंडस्ट्रीजकडे जाणा-या रोडवर भारती विदयापीठ पुणे येथे थांबलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. बातमीचा आशय युनिट २ प्रभारी क्रांतीकुमार पाटील यांना कळवली असता त्यांनी लागलीच कारवाई बाबत आदेशीत केल्याने युनिट २ कडील वरील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावुन गुप्त पाहणी केली व पाठलाग करुन शिताफिने पकडले.
विजय चव्हाण व सुरज गुप्ता अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले आहेत. पकडलेल्या आरोपींकडून १ पिस्टल, ५ जिवंत काडतुस, मोबाईल फोन असा मिळुन १,२६,६६०/- रु. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुध्द भारती विदयापीठ पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजि. क्रमांक ७०७/२०२२ भा.द.वि. कलम ३९९,४०२ ऑर्म अॅक्ट ३ (२५).४(२५) व म.पो.अॅक्ट ३७ (१) (३) संह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि वैशाली भोसले गुन्हे शाखा युनिट २ या करीत आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सह आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, श्रीनिवास घाडगे, सहा.पो.आयुक्त गुन्हे, गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक, क्रांतीकुमार पाटील, गुन्हे शाखा, युनिट-२, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले, सपोनि विशाल मोहिते, पोउपनिरी राजेंद्र पाटोळे, पोलिस अंमलदार नामदेव रेणुसे, शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, विनोद चव्हाण, संजय जाधव, मोहसीन शेख, विजयकुमार पवार, रेश्मा उकरंडे, साधना ताम्हाणे, उत्तम तारु, प्रमोद कोकणे, गणेश थोरात, गजानन सोनुने, कादिर शेख, नागनाथ राख या पथकाने केलेली आहे.