• October 31, 2022
  • No Comment

HSC पास आणि पदवीधरांसाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज

HSC पास आणि पदवीधरांसाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच ‘एबीपी माझा’ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

स्टेट बँक ऑफ इंडिया, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि टाटा मेमोरियल सेंटर मुंबई या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

पोस्ट – सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

शैक्षणिक पात्रता – पदवीधर, कोणत्याही प्रादेशिक ग्रामीण बँकेत अधिकारी म्हणून किमान २ वर्षांचा अनुभव

एकूण जागा – 1 हजार 422

वयोमर्यादा – 21 ते 30 वर्ष

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 नोव्हेंबर 2022

तपशील – sbi.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Join SBI मध्ये current openings वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, रत्नागिरी

पोस्ट – यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल-II, प्रशासकीय सहायक

शैक्षणिक पात्रता – यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल-II साठी पदव्युत्तर पदवी, प्रशासकीय सहायक पदासाठी पदवीधर ही पात्रता हवी

एकूण जागा – 9

वयोमर्यादा – 38 वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण – रत्नागिरी

अर्ज पाठवण्याचा पत्ता – NAHEP – IDP कार्यालय,

DBSKKV, दापोली

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2022

तपशील – www.dbskkv.org (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment मध्ये read more वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

 

टाटा मेमोरियल सेंटर मुंबई

पोस्ट – डेटा एन्ट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता – 12वी पास, संगणकाचा किमान 6 महिन्यांचा कोर्स किंवा MS-CIT प्रमाणपत्र, 1 वर्षाचा अनुभव

एकूण जागा – 4

नोकरीचं ठिकाण – मुंबई

थेट मुलाखतीतून निवड होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता – रुम नं. 205, दुसरा मजला, सेंटर फॉर

कॅन्सर एपीडिमिओलॉजी, अॅडवान्स सेंटर फॉर ट्रिटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर, सेक्टर 22, खारघर, नवी मुंबई – 410210

मुलाखतीची तारीख – 21 नोव्हेंबर 2022

तपशील – www.actrec.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. advertisement number – CCE/Advt/1031/2022 यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल).

Related post

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी; आसा करा अर्ज

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌…

सर्वसामान्‍य नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…
तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमची वीजबिले कधी कल्पनेपेक्षा जास्त आली आहेत का? वीज वाचवत असूनही जास्त बिल येत असेल तर तुमच्या वीजमीटरमध्ये काहीतर गडबड किंवा…
महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *