• November 14, 2022
  • No Comment

ATM मधून मिळाल्या फटाक्या नोटा कुठे बदलवणार हा आहे सोपा मार्ग

ATM मधून मिळाल्या फटाक्या नोटा कुठे बदलवणार हा आहे सोपा मार्ग

    ATM मधून पैसे काढताना अनेकदा फाटक्या नोटा मिळतात. एकतर नोटा मळकट, तुकडे झालेल्या, चिकट टेपचा वापर करुन जोडलेल्या अशाही मिळतात. अशा फाटक्या नोटांना पर्याय काय आहे? कारण आपल्याकडून फाटक्या नोटा कोणची घेत नाही. त्या दैनंदिन व्यवहारात चालविता येत नाही. अशावेळी या नोटांचे काय करावे? केंद्रीय बँकेचा यासाठी काही नियम आहे का?
    तर यावर अत्यंत सोपा उपाय आहे. कोणत्याही बँकेत तुम्ही या नोटा जमा करु शकतात. त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. बँक तुमच्याकडून या नोटांची नोंद करुन त्याबदल्यात तुम्हाला त्याच मूल्याच्या दुसऱ्या नोटा देते.

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एटीएम मधून निघणाऱ्या फाटक्या, तुटक्या नोटा बदलण्यासाठी नियम तयार केले आहेत. या नियमानुसार, बँकेच्या एटीएममधून फाटक्या नोटा आल्या, तर बँक या नोटा बदलण्यास नकार देऊ शकत नाही.

    नोटा बदलण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. त्यासाठी कोणतीही किचकट प्रक्रिया नाही. जुलै 2016 मध्ये आरबीआयने अशा नोटा बदलण्यासाठी एक परिपत्रकही काढले होते. त्यानुसार, जर एखादी बँक नोट बदलण्यासाठी नकार देत असेल तर तिच्यावर कारवाई होते.

    जर एखादी बँक ग्राहकाला नोटा बदलवून देत नसेल तर अशा बँकेविरोधात नियमानुसार आरबीआय कारवाई करते. ही कारवाई दंडात्मक असते. बँकेला 10 हजार रुपयांपर्यंत दंड लावता येतो. हा नियम बँकांचा शाखांवरही लागू होतो.

    जर बँकेच्या एटीएममधून फाटक्या, तुटक्या नोटा येत असतील तर ही बँकेवर जबाबदारी निश्चित होते. अशा नोटा बदलण्याची जबाबदारी बँकेची असते. त्यामुळे एटीएममध्ये नोटा जमा करतानाच त्याची पडताळणी करणे हे बँकेचे काम असते.

    जर नोटेचा अनुक्रमांक, महात्मा गांधींचा वॉटरमार्क आणि गर्व्हनरची शपथ दिसत असेल, तर बँकेला ती नोट बदलून द्यावी लागते. आरबीआयच्या नियमानुसार, एका व्यक्तीला जास्तीत जास्त 20 नोटाही बदलविता येतात. त्यांचे मूल्य 5000 रुपयांहून अधिकचे नसावे.

    नोटा बदलविण्यासाठी व्यक्तीला अर्ज लिहावा लागेल. एटीएममधून किती तारखेला, वेळ नमूद करत किती रक्कम काढली याचा तपशील नोंदवावा लागेल. तसेच कोणत्या मूल्याची नोट फाटकी आली आहे त्यांचा उल्लेख आणि एटीएमची स्लीप जोडावी लागेल.

     

    Related post

    “समस्या ऐकण्यासाठी रस्त्यावर उतरणारे नगरसेवक; पुण्यातील वेगळा आदर्श”

    “समस्या ऐकण्यासाठी रस्त्यावर उतरणारे नगरसेवक; पुण्यातील वेगळा आदर्श”

    पुणे शहरातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या उद्देशाने भाजपचे नगरसेवक सुनील पांडे लोहगावकर यांनी एक अभिनव उपक्रम सुरू…
    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *