- November 14, 2022
- No Comment
दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई
वानवडी: वानवडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणारा अट्टल गुन्हेगार नामे अजय विजय उकिरडे वय २० वर्षे रा. लक्ष्मीमाता मंदिराचे पाठीमागे, रामटेकडी, हडपसर, पुणे. हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याचे साथीदारांसह वानवडी भागात लोखंडी कोयता, लोखंडी रॉड, पालघन, लाकडी बांबु या सारख्या
जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, गृह आगळीक, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ०४ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन श्री. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी नमुद इसमाचे विरुध्द एमपीडीए कायदयान्वये कोल्हापुर मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमुद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये श्री. दिपक लगड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पोलीस ठाणे व श्रीमती वैशाली चांदगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली. मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार ८४ गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द केले आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.