- March 20, 2023
- No Comment
आव्हाळवाडी संत बाळूमामा पालखीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
श्री संत बाळूमामांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम आव्हाळवाडी गावात बुधवार पर्यंत राहणार असून दर्शनासाठी मोठ्यासंख्येने भाविक येत आहेत.आव्हाळवाडी गावामध्ये श्री संत बाळूमामांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम बुधवार (दि. २२ मार्च) गुडीपाडाव्या पर्यंत
असणार आहे. पालखी आव्हाळवाडी गावात येताच ग्रामस्थांनी भव्य
मिरवणूक काढून स्वागत केले. २१ मार्च रोजी अमावस्या असल्याने हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे.
पालखी सोहळा मुक्कामी असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये
म्हणून आव्हाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने संत निरंकारी भवन शेजारी माळवाडी रोडलगत योग्य नियोजन करण्यात आले असून भाविकांसाठी महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे. आव्हाळवाडीसह माळवाडी, वडजाई, डोमखेल व इतर गावातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आव्हाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. दररोज हजारो भाविक
दर्शनासाठी गर्दी करत आहेत.