- September 14, 2022
- No Comment
अटक करण्याच्या भीतीपोटी जामीनदाराने केली आत्महत्या, दोन पोलिसांवर गुन्हा दाखल
पुणे: कर्जदाराने कर्जाचे हप्ते थकवल्याने जामीनदारावर दबाव आणला. त्याला अटक करण्याची भीती दाखवली. या भीतीपोटी जामीनदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली.पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून हा प्रकार उघडकीस आला आहे.
पुण्याच्या नाना पेठेत सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी दोघा पोलीस कर्मचार्यांसह कर्जदारावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
राजेंद्र राऊत असे आत्महत्या केलेल्या जामीनदाराचे नाव आहे.याप्रकरणी त्यांची कन्या वैष्णवी राजेंद्र राऊत (वय २३, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
किरण भातलावंडे (रा.गवळी वस्ती, मांजरी), सहायक पोलीस फौजदार भाग्यवान ज्ञानदेव निकम आणि पोलीस हवालदार सचिन रामचंद्र बरकडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही पोलीस कर्मचारी समर्थ पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण भातलवंडे यांनी कर्ज घेतले होते.तर राजेंद्र राऊत हे त्याला जामीनदार होते.आरोपी किरण याने रघुवीर बिजनेस प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद यांच्याकडून टाटा सुमो वित्त ही गाडी घेतली होती.मात्र त्यांनी कर्जाचे हप्ते भरले नव्हते.त्यामुळे सहाय्यक पोलीस फौजदार भाग्यवान निकम यांनी सांगितले होते. मात्र त्यांनी कर्ज फेडण्यास नकार देऊन धमकी दिली होती. त्यानंतर राजेंद्र यांनी या सर्व त्रासाला कंटाळून सोमवारी सकाळी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.