महावितरण वीज कंपनीतील रिक्त पदांवर, कोरोना काळात काम केलेल्या वीज कंत्राटी कामगारांना प्राधान्य द्यावे – वीज कंत्राटी कामगार संघांची मागणी

महावितरण वीज कंपनीतील रिक्त पदांवर, कोरोना काळात काम केलेल्या वीज कंत्राटी कामगारांना प्राधान्य द्यावे – वीज कंत्राटी कामगार संघांची मागणी

पुणे: महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील नियमित रिक्त पदांवर हजारो वीज कंत्राटी कामगार व सुरक्षा रक्षक यांनी कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून काम केले.

त्यामुळे पुढे नोकऱ्या देताना कोरोना काळात काम केलेल्या कंत्राटदार कामगारांना प्राधान्य द्यावे, अशी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांने राज्याचे उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वीज सेवा ही अत्यावश्यक सेवेत येते. ही सेवा देताना राज्यभरात सुमारे 65 कंत्राटी कामगार केवळ कोरोना काळात कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडले. कोरोना काळात पोलीस, हॉस्पिटल, कोव्हीड सेंटर, लॅबोरेटरीज् ,आरोग्य यंत्रणा व अन्य सर्व शासकीय व नागरी सुविधांना लागणारा वीज पुरवठा व यंत्रणा सुरळीत ठेवण्यात या वीज कंत्राटी कामगारांचे देखील मोठे योगदान होते. या शासनाच्या अत्यावश्यक वीज सेवेत काम केलेल्या या कोविड योद्ध्यांनी निसर्ग आणि तोंक्ते वादळात देखील शासन सेवेसाठी अत्यंत महत्त्वाची व मोलाची भुमिका बजावली. त्यामुळे उर्जाखात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उर्जा खात्यातील कोरोना काळात कार्यरत वीज कंत्राटी कामगारांना देखील शासन सेवेत सामावून घ्यावे, त्यांना प्राधान्य द्यावे व न्याय मिळवून द्यावा.

त्यापूर्वी कंत्राटी कामगारांना राज्यभर कंत्राटदाराकडून होत असलेल्या आर्थिक मानसिक शोषणातून तणावमुक्त करत त्यांना कंत्राटदार मुक्त शाश्वत रोजगार द्यावा. अशी राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांना आहे. यासाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा आयोजीत करावी अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी पत्राद्वारे केलेली आहे.

 

Related post

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी; आसा करा अर्ज

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌…

सर्वसामान्‍य नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…
तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमची वीजबिले कधी कल्पनेपेक्षा जास्त आली आहेत का? वीज वाचवत असूनही जास्त बिल येत असेल तर तुमच्या वीजमीटरमध्ये काहीतर गडबड किंवा…
महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *