• October 7, 2022
  • No Comment

पोलीसांनाही दिवाळी बोनस मिळावा

पोलीसांनाही दिवाळी बोनस मिळावा

    सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसमिळत असताना मात्र पोलीसांना अनेक वर्षे बोनस मिळत नाही. हा अन्याय असून पोलीसांना बोनस मिळावा , अशी मागणी महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

    इतर शासकीय कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा असतो, पोलीसांना मात्र 24 तास ड्यूटी असते. रोज 12 ते 15 तास ड्यूटी करावी लागते. स्वत:च्या तब्बेतीकडे, कुटूंबाकडे दुर्लक्ष होते, शांतता व सुव्यवस्थेची जबाबदारी रात्रंदिवस त्यांच्या खांद्यावर असते, या बरोबर, सणसुद, मोर्चे, आंदोलने, मंत्र्यांचे दौरे, व्ही. आय. पी. यांचा बंदोबस्त त्याच बरोबर आप्तकालीन संकटे, पाऊस यासाठी पोलीसांनाच कामावर जुंपले जाते, गेल्या कोरोना काळात तर सर्व जबाबदारी पोलीसांवर टाकण्यात आली, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यापासून ते ॲम्ब्युलंस मिळवून देण्यापर्यंत सर्व कामे पोलीसांनाच करावी लागली.

    कोरोनामुळे अनेक पोलीसांना आपला जीव गमवावा लागला. पोलीसांमुळे कोरोना आटोक्यात आला. महाराष्ट्राच्या सुरक्षेची सर्व भिस्त पोलीसांवर असताना मात्र त्यांना बोनस पासून डावलण्यात येते. पोलीसांना संघटना नसल्यामुळे, त्यांना आवाज उठवता येत नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. विरोधी पक्ष यावर आवाज उठवतात, मात्र ते स्वत: सत्तेत आल्यावर सोईस्करपणे हा विषय सोडून देतात. इतर कुठल्याही शासकीय कामात जीवाची जोखीम नसते. मात्र पोलीसांना जीवाची जोखीम घेऊन काम करावे लागते. सर्वांना बोनस मिळत असताना पोलीसांना डावलणे हे बरोबर आहे का? सर्व म्हणतात हे जनतेचे सरकार आहे. तर मग पोलीसांना त्वरीत 1 महिन्याचा बोनस जाहीर करावा अशी मागणी संघटनेच्या मुख्य कार्यालयात करण्यात आली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *