- October 7, 2022
- No Comment
महिलेचा खून करून मृतदेह जंगलात पुरला
चाकण: खून करून महिलेचा मृतदेह निर्जन भागात नेऊन गाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकण पोलिसांनी महिलेचा पुरलेला मृतदेह चाकण आळंदी रस्त्यावरील वन विभागाच्या जंगलातून गुरुवारी (दि.6 ऑक्टोबर) रात्री उशिरा ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.
आशा गोरक्षनाथ देशमुख (सध्या रा. बोरजाईनगर, मेदनकरवाडी, ता. खेड, मूळ रा. श्रीगोंदा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. संबंधित महिला मागील महिन्याभरापासून बेपत्ता होती. चाकण पोलिसांत याबाबत तिच्या पतीने तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जमिनीत पुरल्याने कुजलेला हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात रात्री आठच्या सुमारास आणण्यात आला आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.