- October 8, 2022
- No Comment
तलवार व चाकूचा धाक दाखवून लुटणारी टोळी गजाआड

हडपसर: नागरिकांना तलवार व चाकू धाक दाखवून व मारहाण करत लुटणाऱ्या टोळीला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. यात पाच आरोपी व त्यांचे दोन अल्पवयीन साथीदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बंटी निकाळजे,चिक्या भडके, अनिकेत सोनावणे, सुमित शिंदे, मोनु शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत तर दोन अल्पवयीन मुले यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी 29 सप्टेंबर रोजी हडपसर येथील आण्णा भाऊ साठे उद्यानात गप्पा मारत बसलेल्या नागरिकांना जबरी चोरीच्या इराद्याने तलवार व चाकुचा धाक दाखवला. तसेच, त्यांना मारहाण करत त्यांच्या जवळील मोबाईल चोरून नेले होते.
या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले, पोलीस अमंलदार हे शोध घेत असताना त्यांनी बातमीदाराच्या माहितीवरून व तांत्रिक तपासाद्वारे आरोपींना अटक केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून 1 लाख रुपायांचे एकूण चार मोबाईल देखील जप्त केले. या गुन्ह्याचा पुढिल तपास पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले करत आहे.





