पुर्व वैमनस्यातून व्यावसायीकाला मारहाण, आरोपींवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
- क्राईम
- September 11, 2022
- No Comment
दिघी: पुर्व वैमनस्याच्या रागातून चौघांनी दिघी येथे एका व्यावसायीकाला सिमेंटचा गट्टू,लाकडी दांडके याने मारहाण करत गंभीर जखमी केले.ही घटना दिघी गावठाण येथे घडली.
याप्रकरणी योगेश हरीभाऊ वाळके (वय 36 रा. दिघी गावठाण) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून किरण कदम, प्रणव चौरे, तौफीक बांगी, किरण नलावडे, प्रसाद भाले, बाबू कदम व इतर 3 ते चार व्यक्तीं विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांची दिघी परिसरात टपरी आहे.शुक्रवारी ते टपरी उघडण्यासाठी गेले असता आरोपी याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीला मारहाण कऱण्यास सुरुवात केली.फिर्यादी यांचा भाऊ भांडणे सोडविण्यासाठी आला असता त्यालाही आरोपींनी मारहाण केली.लाकड़ी दांडके, दगड व सिमेंटचा गट्टूने मारहाण करत गंभीर जखमी केले व तेथून पळून गेले. याप्रकरणी आरोपींवर दिघी पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीघी पोलीस पुढील तपास करीत आहेत.