- September 30, 2022
- No Comment
बकालेंच्या अटकेसाठी पथक सज्ज, मराठा समाजाच्या वतीने अटकेची तीव्र मागणी
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या अटकेसाठी तपासपथक गेल्या तीन दिवसांपासून ठाणे शहरातच मुक्कामी आहे.
पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात असल्याचे सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी माहिती देताना सांगितले.
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. बकाले यांचा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर मराठा समाजाच्या वतीने अटकेची तीव्र मागणी होत आहे. बकाले यांच्या शोधार्थ तपास पथक गेल्या तीन दिवसांपासून ठाणे येथे मुक्कामी असून मिळालेल्या प्रत्येक माहितीचा कसून तपास केला जात आहे.
गुन्ह्यातील सहाय्यक फौजदार अशोक महाजन याला सहआरोपी केल्यानंतर तोही बेपत्ता झाला आहे. दाखल गुन्ह्यात वाढीव कलम लावण्यात आले असून संशयितांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल असे, सहाय्यक पोलिस अधीक्षक चिंता यांनी सांगितले आहे.