• March 16, 2025
  • No Comment

थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

पिंपरी: मार्च अखेर जवळ येत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत तब्बल १६ हजार २६५ थकबाकीदारांच्या मालमत्ता सील केल्या आहेत.

निवासी व बिगरनिवासी अशा एकूण १०५१ मालमत्ता जप्त केल्या आहेत. कारवाईच्या वेळेस थकबाकीसह संपूर्ण मालमत्ताकराचा भरणा केल्याने १५ हजार २१४ मालमत्तांवर कारवाई केली गेली नाही.

कर संकलन विभागास एक हजार कोटी रुपये वसुलीचे २०२४-२५ या आर्थिक वर्षांत उद्दिष्ट आहे. मार्च महिना संपण्यास केवळ १९ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे थकबाकीदारांवर कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. आतापर्यंत तब्बल १६ हजार २६५ थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.

कारवाईच्या वेळेस एकूण १५ हजार २१४ मालमत्ताधारकांनी संपूर्ण बिल भरल्याने कारवाई करण्यात आली नाही. त्यांच्याकडून एकूण १३८ कोटी ४१ लाख ७२ हजार ५७३ रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. १०५१ मालमत्ताधारकांनी कारवाईच्या वेळेस बिल न भरल्याने त्या मालमत्ता सील करून जप्त केल्या आहेत. या थकबाकीदारांकडून एकूण २६ कोटी ५५ लाख ३१ हजार ३१८ रुपये असा थकीत कर येणे बाकी आहे.

दिवसभरात ४०७ मालमत्तांवर कारवाई:

कर संकलन विभागाच्या विविध १८ पथकांनी थकबाकीदारांच्या एकूण ४०७ मालमत्तांवर कारवाई केली. त्यातील ४०४ थकबाकीदारांनी कारवाईच्या वेळेस थकीत बिलाचा भरणा केला. ती रक्कम एकूण ३ कोटी ११ लाख ५९ हजार ७४८ रुपये इतकी आहे. त्यामुळे त्या थकबाकीदारांवर मालमत्ता सीलची कारवाई केली नाही, तर ३ जणांनी बिलाचा भरणा न केल्याने त्यांच्या मालमत्ता सील केल्या आहेत. त्यांच्याकडून एकूण २ लाख ५९ हजार ४९३ रुपयांची थकबाकी आहे.

Related post

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय तरूणाला १० वर्षे ‘सक्तमजुरी’

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय…

पुणे: बेकायदेशीरपणे घरात घुसून नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला १० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व…
महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून २१ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, नोकरीला न लावता तसेच रक्कम परत…
पुणे: धुलवडीला 402 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई ! 386 वाहने जप्त, एकाच दिवसात लाखोंचा दंड

पुणे: धुलवडीला 402 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई ! 386 वाहने…

पुणे: होळी आणि धुलीवंदन साजरा करताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करु नये, यासाठी वाहतूक शाखेने विशेष मोहिम राबविण्यात आली. त्यात मद्यपान करुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *