• March 16, 2025
  • No Comment

पुणे: धुलवडीला 402 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई ! 386 वाहने जप्त, एकाच दिवसात लाखोंचा दंड

पुणे: धुलवडीला 402 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई ! 386 वाहने जप्त, एकाच दिवसात लाखोंचा दंड

    पुणे: होळी आणि धुलीवंदन साजरा करताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करु नये, यासाठी वाहतूक शाखेने विशेष मोहिम राबविण्यात आली. त्यात मद्यपान करुन वाहन चालवणार्‍या ४०२ तळीमारांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली.

    एकूण ६ हजार ११८ केसेस करण्यात येऊन त्यांच्यावर ५० लाख ९४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

    पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे होळीचा सण आनंदी, सुरक्षित साजरा करता यावा, या करीता शहरातील बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी १४ मार्च रोजी विशेष मोहिम आखण्यात आली होती. त्यात ९० ठिकाणी नाकाबंद करण्यात आली़ तेथे वाहनांची तपासणी केली गेली.

    शहरामधील एकूण ३७ वाहतूक विभाग व संबंधित पोलीस ठाण्याकडून लावण्यात आलेल्या नाकाबंदीमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या बेशिस्त वाहनचालकांवर ट्रिपल सिट, राँग साईड, ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हच्या कारवाई अंतर्गत ३८६ वाहने जप्त करुन एकूण ६ हजार ११८ केसेस करण्यात आल्या. त्यांच्यावर एकूण ५० लाख ९४ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

    एकूण केसेस – ६११८

    एकूण दंडात्मक रक्कम – ५०९४००० रुपये

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *