• September 18, 2022
  • No Comment

चिखली:चक्क निवृत्त पोलिसाला दोन लाख रुपयांचा गंडा

चिखली:चक्क निवृत्त पोलिसाला दोन लाख रुपयांचा गंडा

चिखली: मुलाला नोकरी लावतो म्हणून चक्क निवृत्त पोलिसाला दोन लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2018 ते 16 सप्टेंबर 2022 या कालावधीत शरदनगर, चिखली येथे घडला.

भगवान गेनू म्हस्के (वय 57, रा. शरदनगर, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय धोंडिबा पवार, ठकसेन धोंडिबा पवार (दोघे रा. जेऊर, ता. पुरंदर, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा प्रतीक हा नोकरीच्या शोधात असताना त्याची आरोपींशी ओळख झाली. आरोपींनी आपसात संगनमत करून संजय पवार याची पश्चिम महाराष्ट्रातील एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत ओळख आहे. त्याने बऱ्याच मुलांना नोकरीला लावले आहे. नोकरीला लावण्यासाठी प्रत्येकी चार ते पाच लाख रुपये आम्ही घेतो, असे फिर्यादींना सांगितले. पण, तुम्ही ओळखीचे असल्याने तुमच्या मुलाचे दोन लाख रुपयात नोकरीचे काम करून देतो, अशी खात्री आरोपींनी दिली. आरोपींवर विश्वास ठेऊन फिर्यादींनी आरोपीच्या बँक खात्यात दोन लाख रुपये जमा केले. पैसे घेतल्यानंतर फिर्यादींच्या मुलाला नोकरी न लावता त्यांची फसवणूक केली.

पुढिल तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Related post

केसनंदमधील आर्यन बिअरबार समोरील घटना पिस्टलमधून गोळीबार, रुग्णवाहिकेची तोडफोड

केसनंदमधील आर्यन बिअरबार समोरील घटना पिस्टलमधून गोळीबार, रुग्णवाहिकेची तोडफोड

पुणे : व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकावर पिस्टलातून गोळीबार करुन रुग्णवाहिकेवर दगडफेक करुन तिची तोडफोड करण्यात आली. वाघोली पोलिसांनी…
सराईत गुन्हेगार  कडुन अंमली पदार्थाच्या तस्करीत  पुण्यात गांजा घेऊन येताना अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

सराईत गुन्हेगार कडुन अंमली पदार्थाच्या तस्करीत पुण्यात गांजा घेऊन…

पुणे : सराईत गुन्हेगाराकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने ३ लाख रुपयांचा गांजा हस्तगत केला आहे. साहिल विनायक जगताप (वय २८, रा.…
हिंजवडी पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला केले जेरबंद

हिंजवडी पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला केले जेरबंद

हिंजवडी पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला जेरबंद केल आहे. साहिल मेहबूब शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून दहा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *