• September 17, 2022
  • No Comment

भोसरी:गांजा विक्री करणारी महिला जेरबंद

भोसरी:गांजा विक्री करणारी महिला जेरबंद

भोसरी:अंमली पदार्थ विरोधी पथकाने शहरात गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक केली. ही कारवाई बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी एमआयडीसी येथे करण्यात आली.

सहायक पोलीस फौजदार बाळासाहेब सूर्यवंशी यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी आरोपी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूर्यवंशी हे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकात नेमणुकीस आहेत.बालाजीनगर झोपडपट्टी येथे राहणारी एक महिला गांजा विकत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास कारवाई करून महिलेला ताब्यात घेतले.आरोपी महिलेकडे 21 हजार 375 रुपये किमतीचा 855 ग्रॅम गांजा आढळून आला. हा गांजा महिलेने आनंद उर्फ आप्पा काळे (रा. परंडा रोड, कुर्डूवाडी, जि. सोलापूर) याच्याकडून विकत आणला असल्याचे निष्पन्न झाले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

Related post

पुणे शहरात जमाव, मिरवणूक व निदर्शनांवर निर्बंध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३९ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे शहरात जमाव, मिरवणूक व निदर्शनांवर निर्बंध महाराष्ट्र पोलीस…

पुणे: पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३९ (१)(२)(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश…
हडपसरमधील कळेपडळ अंडरपास अपघात — निष्काळजीपणाची जळती हकीकत

हडपसरमधील कळेपडळ अंडरपास अपघात — निष्काळजीपणाची जळती हकीकत

पुणे हडपसर :हडपसरमधील महत्त्वपूर्ण कळेपडळ अंडरपासवरील उंचीबंदी अचानक कोसळल्याने एका दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली, आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उठली आहे. ही…
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या विशेष पथकाने वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून १५ लाख रुपये किंमतीच्या ३७ दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या विशेष पथकाने वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या परिमंडळ एक मधील वाहन चोरी विरोधी विशेष पथकाने वाहनचोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. १५ लाख…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *