- September 18, 2022
- No Comment
मामाने भाच्या सोबत केल अस काही, की मामावर गुन्हा दाखल करण्यात आला
भोसरी: भाच्याचे अपहरण करून त्याला मारहाण करणाऱ्या दोन मामावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना केळगाव आणि भोसरी येथे घडली.
दत्तात्रय तुकाराम ढेरंगे, अशोक रंभाजी ढेरंगे (रा. गुळाणी, ता. खेड) आणि त्यांचे पाच साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी दत्तात्रय यांच्या भाच्याने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बुधवारी सकाळी साडेसात वाजता केळगाव येथील सिद्धबेट जवळ इंद्रायणी नदीच्या पुलावर आले असता अनोळखी पाच जणांनी त्यांना कारमध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण केले. फिर्यादींना भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या पाठीमागे मोकळ्या मैदानात आणून त्यांना जबरदस्तीने बसवून ठेवले. अपहरण करणाऱ्या आरोपींनी फिर्यादी यांचे मामा दत्तात्रय ढेरंगे याला फोन केला. तासाभराने फिर्यादीचा मामा दत्तात्रय ढेरंगे आणि चुलत मामा अशोक ढेरंगे असे तिथे आले.
त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत, तुझ्या बापाला लै माज आलाय का, तो दुसरे लग्न कसे करतो तेच आम्ही बघतो अशी दमदाटी करत लाकडी काठीने पाठीवर, हातावर, पायावर बेदम मारहाण केली. यात फिर्यादीचा पाय फ्रॅक्चर झाला.
पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.