- September 18, 2022
- No Comment
भोसरी: नराधम पती मुळे पत्नी ची आत्महत्या
भोसरी: पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी येथे घडला.
आकाश चंद्रकांत पुट्टे (वय 26, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. अंजूषा आकाश पुट्टे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेची नाव आहे. याप्रकरणी अंजूषा यांचे वडील संजीवकुमार मोहनराव वल्लापे (वय 47, रा. कर्नाटक) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचा आरोपी आकाश याच्यासोबत विवाह झाला होता. विवाहाच्या सहा महिन्यांपासून आकाश याने अंजूषा यांना त्रास देण्यास सुरुवात केली. तो दारू पिऊन वारंवार अनुषा यांना मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देत असे. या त्रासाला कंटाळून अंजूषा यांनी बुधवारी (दि. 14) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी आकाश याला अटक केली आहे.
पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.