जुनी सांगवी:अट्टल गुंड जोग्या जाधव येरवडा कारागृहात स्थानबद्ध
- क्राईम
- September 11, 2022
- No Comment
जुनी सांगवी: सांगवी परिसरातील सराईत गुंड जोग्याला अखेर येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. अक्षय ऊर्फ जोग्या हेमंत जाधव (25, रा. जुनी सांगवी) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जोग्या याच्या विरोधात सांगवी पोलिस ठाण्यात मागील तीन वर्षांत 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा गुन्हेगारीचा चढता आलेख पाहून वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोणपे यांनी एमपीडीएची कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला.
हा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, उपआयुक्त, अपर आयुक्त यांच्या मार्फत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे सादर करण्यात आला. दरम्यान, गुरुवारी (दि. 8) या प्रस्तावाला मंजुरी देत जोग्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.