पुण्यात एकोणतीस तासानंतर विसर्जन मिरवणूक पुर्णपणे पार पडली, शेवटी थकलेल्या पोलिसांनीही डॉल्बीवर ठेका धरला
- पुणे
- September 10, 2022
- No Comment
पुणे: दोन वर्षानंतर गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झाले होते. अखेर 29 तासानंतर अनंत चतुर्दशीला सुरु झालेली विसर्जन मिरवणूक अखेर पुर्णपणे पार पडली.
दोन वर्षानंतर पुण्यात मोठी गर्दी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे निर्बंधमुक्त मिरवणूक असल्याने ढोल ताशापासून ते डॉल्बीपर्यंत पुणेकरांनी मनमुराद नाचून आनंद घेतला.
काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी 10 वाजता या मिरवणुकीला सुरुवात झाली होती ती तब्बल २९ तास चालली. संध्याकाळी 5.30 वाजता शेवटच्या गणपतीचे विसर्जन झाले आणि पुणे शांत झाले. लहान मंडळापासून ते मोठ्या मानाच्या गणपतींपर्यंत सर्वत्र ढोल-ताशा, डॉल्बी, वेगवेगळे देखावे आणि त्यामुळे झालेली वाहनांची कोंडी पाहायला मिळाली. कुठेही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. शेवटी थकलेल्या पोलिसांनीही डॉल्बीवर ठेका धरला. शेवटच्या मंडळातील कार्यकर्त्यांनी पोलीसांना गाण्यावर नाचायला भाग पाडले. तो व्हिडिओ पूर्ण पहा. पोलीसांचा २२/२३ तास ड्युटी केल्याचा शीण निघून गेला.
अशा प्रकारे उत्साहात यंदाची मिरवणूक आणि अविस्मरणीय विसर्जन सोहळा पार पडला.
https://youtu.be/1jfNjBASkMw