कदमवाकवस्ती : पूर्व हवेलीत पुणे सोलापूर महामार्गांवर महाविद्यालयीन अल्पवयीन युवकांचे वारंवार होणारे दुचाकी अपघात या गंभीर विषयाची जनजागृती संदर्भात इनोवेरा स्कूलच्यावतीने शनिवारी(दि.२७) प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यालयाचे प्राचार्य सुप्रिया श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सुमारे ११० विद्यार्थ्यांनी या प्रभात फेरीमध्ये सहभाग घेतला.
या प्रभात फेरीची सुरुवात लोणी काळभोर बाजारपेठेपासून करण्यात आली. पोलीस स्टेशन, खोकलाई मंदिर, विठ्ठल मंदिर, पालखीतळ, संभाजीनगर असा प्रभात फेरीचा मार्ग होता. यावेळी लोणी काळभोर पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक तरटे यांनी प्रभात फेरीमध्ये सहभाग नोंदवला. १८ वर्षाखालील मुला मुलींना वाहन चालवण्यास पालकांनी परवानगी दिल्यामुळे अनेक अपघात होताना दिसत आहे. मागील आठवड्यात लोणी काळभोर व कदम वाकवस्ती गावालगत असलेल्या सोलापूर हायवे ला दोन भीषण अपघात झाले यामध्ये तीन शाळकरी विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. सदरच्या घटना टाळण्यासाठी पालकांनी १८ वर्षाखालील मुलांना वाहन चालवण्यास अनुमती देऊ नये, असा या प्रभात फेरीचा मुख्य हेतू होता. प्रभात फेरीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. यातून समाज जागृती करून वाहन चालवताना कोणती काळजी व नियम पाळावे हे सांगण्यात आले. यावेळी इनोवेरा स्कूलचे सर्व शिक्षक रुंद शिक्षकेतर कर्मचारी पोलीस चौकीचे अधिकारी यांचा समावेश होता
पिंपरी: मार्च अखेर जवळ येत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत तब्बल…