कदमवाकवस्ती : मांग गारुडी समाज युवक संघाच्या प्रयत्नातुन घेतलेल्या शिबिरामध्ये हवेली तालुक्यातील मांग गारुडी समाजातील लोकांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले. या शिबिरामध्ये हडपसरचे मंडल अधिकारी वेंकेटेश चिरमुले, अव्वल कारकून राजाभाऊ मोराळे व सेतू कार्यालय प्रमुख सोपान वाघ व संघटनेचे संस्थापक रामचंद्र सकट, प्रदेशाध्यक्ष हरिष सकट,जिल्हाध्यक्ष केशव राखपसरे, मांग गारुडी समाजातील जेष्ठ मान्यवर ज्ञानोबा सकट,ज्ञानोबा लोंढे, विठ्ठल राखपसरे,भानुदास खलसे,जगन उपाध्ये,मधुकर सकट, अप्पासाहेब बोडके,मल्हारी सकट व इतर मान्यवरांच्या हस्ते जातीचे दाखले वाटप करण्यात आले. यावेळी मांग गारुडी समाज युवक संघ पुणे जिल्हा व महाराष्ट्र राज्याचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.