किरकोळ बाचाबाचीवरून दोघांच्या मारहाणीत  कदमवाकवस्तीत एका युवकाचा मृत्यू

किरकोळ बाचाबाचीवरून दोघांच्या मारहाणीत  कदमवाकवस्तीत एका युवकाचा मृत्यू

कदमवाकवस्ती (पुणे):घोरपडे वस्ती येथील मित्रांमध्ये झालेल्या शुल्लक कारणातून झालेल्या वादात दोघाजनांकडून एका मित्राला दगड व लोखंडी रॉडच्या साहाय्याने झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्ती येथे मंगळवारी (ता.३०) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.अब्दुल हमीद शमशुद्दिन शेख (वय ३५, रा. घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सागर पाटोळे व सागर गुडेकर (पूर्ण नाव माहित नाही ) रा. घोरपडेवस्ती, कदमवाकवस्ती, (ता. हवेली) असे खून करणाऱ्या दोघांची नावे असून पोलिसांना दोघांनाही ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी त्यांची पत्नी उल्फत अब्दुल हमीद शेख(वय – ३२, रा. सदर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्फत व अब्दुल हे मागील १५ वर्षापासून कुटुंबासहित कदमवाकवस्ती येथील घोरपडेवस्ती परिसरात राहतात. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उल्फत या घरकाम संपवून घरी आले होते. घरातील कामाची आवराआवर करीत असताना सात वाजण्याच्या सुमारास अब्दुलच्या मित्राने मोबाईलवर सांगितले कि, तुमच्या पतीला इंदिरानगर चौकात पाण्याच्या टाकीजवळ सागर पाटोळे व सागर गुडेकर हे मारहाण करीत आहेत. तिघांच्या झालेल्या भांडणाच्या कारणावरून तुमच्या पतीला लोखंडी रॉड व दगडाने डोक्यात मारून गंभीररित्या जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. व त्यांना लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उल्फत यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता अब्दुल हमीद शेख हे बेशुद्ध अवस्थेत दिसून आले व

डोक्याला पट्टी बांधलेली दिसून आली. सदर ठिकाणच्या
दवाखान्याचा खर्च परवडत नसल्याने ससून ठिकाणी पुढील उपचाराकरिता घेऊन गेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. सदर ठिकाणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे करीत आहेत.

Related post

अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून  अटक

अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी…

पुणे : अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्यांच्याकडून ४ किलो ८०१ ग्रॅम गाजा हस्तगत केला…
पुणे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन शहरात नव्या सात पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आल्यानंतर आता या सात पोलीस ठाण्यांची हद्द निश्चिती

पुणे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन शहरात नव्या…

पुणे : शहराचा वाढता विस्तार, गुन्हेगारी आणि त्यामुळे निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन शहरात नव्या सात पोलीस ठाण्यांना…
विम्याच्या नावाखाली तरुणाची ९० हजार ७८० रुपयांची ऑनलाइन फसवणूक

विम्याच्या नावाखाली तरुणाची ९० हजार ७८० रुपयांची ऑनलाइन फसवणूक

पिंपरी : क्रेडीट कार्डवरील विमा नको असल्यास प्रोसेस करून ओटीपी नंबर सांगण्यास भाग पाडून त्याद्वारे एका तरुणाची ९० हजार ७८० रुपयांची…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *