• June 28, 2023
  • No Comment

फ्लॅट विक्रीच्या व्यवहारात ग्राहकाची साडे पन्नास लाखांची फसवणूक,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

फ्लॅट विक्रीच्या व्यवहारात ग्राहकाची साडे पन्नास लाखांची फसवणूक,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    वाकड: फ्लॅट विक्रीचा व्यवहार ठरवून त्या बदल्यात साडे पन्नास लाख रुपये घेत एका ग्राहकाची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 30 मार्च 2022 ते 26 जून 2023 या कालावधीत वाकड येथे घडला आहे.

    याप्रकरणी अजिंक्य रवींद्र ओझा (वय 32 राहणार वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रुपेश छोटा लाल शेठ (वय 55 राहणार कोरेगाव पार्क) व उतीन चव्हाण (वय 40 राहणार कोरेगाव पार्क) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शेट अँड पोपट एंटरप्राइजेस कंपनीद्वारे वाकड येथील टीयारा सोसायटीतील फ्लॅट क्रमांक 1201 या फ्लॅटचा फिर्यादी सोबत एक कोटी 18 लाख 8 हजार रुपयांचा व्यवहार ठरवला. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करत त्यांच्याकडून आरटीजीएस द्वारे 34 लाख 4 हजार 200 रुपये तर रोख स्वरूपात 16 लाख 50 हजार रुपये असा एकूण 50 लाख 54 हजार दोनशे रुपये घेतले.

    मात्र आज तागायत फ्लॅटचा व्यवहार न करता घेतलेली रक्कम ही परत केली नाही. तसेच परस्पर हा फ्लॅट इतर दोघांना विकत फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *