- June 28, 2023
- No Comment
नव्वद हजाराच्या गुटख्यासह आरोपी गजाआड,एमआयडीसी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
म्हाळुंगे: एमआयडीसी पोलिसांनी एकाला चाकण येथील आंबेठाण येथून 92 हजार रुपयांच्या गुटख्यासह अटक केली आहे.
सवाराम रताराम चौधरी (वय 42 राहणार चाकण मूळ राजस्थान) असे अटक आरोपीचे नाव असून महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई शरद खैरे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार, आरोपी हा त्याच्या ईरटीगा कार (एम एच 14 डीएक्स 0766) या गाडीमध्ये बेकायदेशीर रित्या 92 हजार 610 रुपयांचा गुटखा घेऊन विक्रीसाठी थांबला होता.
पोलिसांना खबर मिळतात पोलिसांनी त्याला गाडी व इतर मुद्देमालासह अटक केली आहे. आरोपी विरोधात गुन्हा दाखल असून म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.