• June 28, 2023
  • No Comment

आंतरराष्ट्रीय कंपनीतून बोलत असल्याचे सांगत साडे सहा लाखांना घातला गंडा

    पिंपरी: एका आंतरराष्ट्रीय कंपनीतून बोलत असल्याचे सांगत एका महिलेने तरुणाची तब्बल साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना पिंपरी येथे ऑनलाइन पद्धतीने घडली आहे.

    याप्रकरणी प्रतीक कौशल किशोर कँसल (वय 37 राहणार पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मीरा रुबीना (पूर्ण नाव नमुद नाही) हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्हाट्सअप क्रमांक 91 7402346242 या मोबाईल क्रमांकावरून फिर्यादी यांना मेसेज पाठवण्यात आला.

    यावेळी मीरा रुबीना बोलत असून HUBSOT AN AMERICAN GLOBLAL MEDIA MARKETING & CORPORATE COMMUNICTION HOLDING COMPANY या कंपनीची एच आर मॅनेजर असल्याचे सांगत फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून ऑनलाईन पद्धतीने फिर्यादी यांची सहा लाख 65 हजार 650 रुपयांची फसवणूक केली आहे यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *