- June 28, 2023
- No Comment
धक्कादायक! दर्शनाच्या गळ्यावर कटरने वार करत डोक्यात दगड घालून केला खून, आरोपी गजाआड
पुणे: दर्शनाशी लग्नाच्या कारणावरून वाद झाल्यानंतर रागाच्या भरात तिच्यावर कंपासमधील कटर ब्लेडने तीन ते चारवेळा वार केले. कटरचा वार गळ्याला लागल्याने दर्शनाच्या गळ्यातून रक्तस्राव सुरु झाला.
त्यानंतर दगडाने मारहाण करत तिचा खून केला, अशी कबुली आरोपी राहुल हंडोरे याने सोमवारी पोलिसांना दिली. हे सगळे माझ्या हातून अनवधानाने घडले, असेही राहुलने चौकशीदरम्यान सांगितल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
एमपीएससीच्या परीक्षेसाठी आम्ही दोघे एकत्र अभ्यास करत होतो. यादरम्यान मी तिला प्रपोजही केले होते. एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी तिला मदत केली. एमपीएससी परीक्षा पास झाल्यावर दर्शनाने लग्नाला नकार दिला. याचाच राग आल्याने मी तिला संपवायचे ठरविल्याचे राहुल याने चौकशीदरम्यान सांगितले. या घटनेच्या सीसीटीव्हीबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.