• December 21, 2024
  • No Comment

ईपीएफमधील पैसे आता एटीएममधून काढता येणार; काय आहे प्रक्रिया?

ईपीएफमधील पैसे आता एटीएममधून काढता येणार; काय आहे प्रक्रिया?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी तसंच कर्मचारी राज्य विमा निगमच्या सदस्यांना त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेण्यासाठी आता एटीएमची सुविधाही दिली जाणार आहे. त्यामुळे ईपीएफओ खात्यातील पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत होणार आहे.

यावर केंद्रीय श्रम मंत्रालय विचार करत असून त्यासाठी एटीएम आणि ई-वॉलेट्स प्रणाली विकसित करण्यात येत आहे. एप्रिल २०२५ पासून हा बदल कार्यान्वित होऊ शकतो.

श्रम मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांच्या माहितीनुसार ईपीएफओ खात्यातून रक्कम काढण्याची प्रक्रिया सोपी करण्याबाबत विचार सुरू आहे. ऑटो सेटलमेंट प्रकरणात रक्कम खातेदाराच्या बँक खात्यात जाईल, यानंतर कर्मचारी एटीम कार्डवरुन देखील रक्कम काढू शकतो. याशिवाय ईपीएफओकडून असा प्रयत्न केला जात आहे की क्लेमची रक्कम ई-वॉलेटमध्ये देखील पाठवता येईल. या सुविधांची अंमबजावणी करण्यासंदर्भात नवी व्यवस्था देखील तयार केली जात आहे.

सुमिता डावरा यांनी यासंदर्भात म्हटलं की नवी व्यवस्था लागू करण्यासाठी बँक आणि इतर वित्तीय संस्थांसोबत चर्चा सुरु केली आहे. लवकरच एक व्यावहारिक योजना लागू करण्यात येईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासोबत देखील या संदर्भात संपर्क सुरु असल्याचं म्हटलं. ईपीएफओशी संबंधित एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार ही प्रक्रिया केवळ रक्कम काढण्यासंदर्भात सोपी करण्यात येत आहे. पीएफ खात्यातून रक्कम काढण्यासंदर्भातील नियम बदलले जाणार नाहीत. सध्या लागू असलेल्या नियमानुसार कर्मचारी एका वेळी जितकी रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध आहे ती सुरु राहील.

ईपीएफओ पेन्शनच्या उच्च वेतन पर्यायांची चौकशी आणि वेतन विवरण अपलोड करण्याची तारीख ३१ जानेवारीपर्यंत वाढण्यात आली आहे. ईपीएफओच्या माहितानुसार ३.१ लाख अर्जदारांना मुदतवाढीचा फायदा होणार आहे.

देशभरात सध्या पीएफ खातेदारांची संख्या २०२३ च्या तुलनेत वाढली आहे. ईपीएफओमध्ये जवळपास ७ कोटी ४७ लाख खातेदार २०२४ मध्ये योगदान देत आहेत. या खातेदारांकडून त्यांच्या मूळ वेतनाच्या १२.५ टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. तर, कंपनीकडून देखील १२.५ टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. त्यापैकी काही रक्कम पीएफमध्ये तर काही रक्कम पेन्शन खात्यात जमा केली जाते.

पीएफ खातेदारांना दरवर्षी व्याज दिलं जातं. पीएफ खातेदारांना साधारणपणे ८ ते ८.५० टक्क्यांच्या दरम्यान व्याज मिळतंय. आगामी वर्षांमध्ये अधिक व्याज देण्यासाठी ईपीएफओकडून इटीएफमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. सध्या इटीएफमध्ये ईपीएफओकडून १० टक्के रक्कम गुंतवली जाते.

Related post

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी; आसा करा अर्ज

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌…

सर्वसामान्‍य नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…
तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमची वीजबिले कधी कल्पनेपेक्षा जास्त आली आहेत का? वीज वाचवत असूनही जास्त बिल येत असेल तर तुमच्या वीजमीटरमध्ये काहीतर गडबड किंवा…
महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *