• December 21, 2024
  • No Comment

स्टेरॉईड इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री, दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

स्टेरॉईड इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री, दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    शिवाजीनगर: शहरातील विविध व्यायामशाळांमध्ये ( जिम) व्यायाम करणाऱ्या तरुणांना शरीरयष्टी चांगल्याप्रकारे व्हावी या उद्देशाने स्टेरॉईड इंजेक्शन मेफेटर्मिन सल्फेट इंजेक्शन बेकायदेशीररित्या विक्री केल्याप्रकरणी दोन जणांवर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली आहे.

    याप्रकरणी आरोपींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून आरोपींच्या ताब्यातून पाच हजार रुपयांचे बेकायदेशीर १४ स्टेरॉईड इंजेक्शन जप्त करण्यात आली

    शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात दीपक बाबुराव वाडेकर ( वय ३२, रा.खडकी) आणि साजन अण्णा जाधव (वय २५, रा. औंध) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार तेजस रमेश चोपडे यांनी तक्रार दाखल केलेली आहे.

    संबंधित आरोपी हे नरवीर तानाजी वाडी येथील इराणी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका मोटारीमध्ये बेकायदेशीर स्टेरॉईड इंजेक्शन घेऊन थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपींकडे औषधे बिल नसताना औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या जीवीतास धोका किंवा आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते हे माहिती असतानाही संबंधित औषधे अवैधरीत्या प्राप्त करून गैरवापर करण्याचे उद्देशाने जवळ बाळगल्याचे दिसून आले. संबंधित इंजेक्शन त्यांनी कोठून आणले, ते कोणाला विक्री करणार होते, त्यांचे अन्य साथीदार कोण आहेत याबाबत

    पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *