• December 21, 2024
  • No Comment

तुमच्या खात्यावर लाडकी बहीणचे पैसे येणार की नाही, कसं चेक करायचं?

तुमच्या खात्यावर लाडकी बहीणचे पैसे येणार की नाही, कसं चेक करायचं?

    मुंबई: डिसेंबरचा अर्धा महिना संपला तरी अजूनही लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता मिळालेला नाही. हा हप्ता कधी मिळणार याची चर्चा सुरू होती, मकरसंक्रांतीपर्यंत महिलांच्या खात्यावर जमा होईल असं सांगितलं जात असताना मुख्यमंत्री फडणवीस विधिमंडळात याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याबाबत माहिती दिली.

    फडणवीस म्हणाले की, हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता येईल. साधारण 23 तारखेपासून लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे यायला सुरू होती. त्याआधी अनेक भागांमध्ये महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. पुण्यात जवळपास 10 हजार अर्ज तर जळगाव, लातूर भागातही हजारोंच्या संख्येनं अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. निकषांची पूर्तता न केल्याने हे अर्ज बाद झाले आहेत.

    २१०० रुपये कधी मिळणार?
    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की तूर्तास तरी निकषांमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत. 2100 रुपये मिळण्यासाठी लाभार्थी महिलांना बजेटपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिवाय एकाच घरातील दोन महिलांना देखील लाभ मिळण्याबाबत लवकरच निर्णय होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. ज्यांना पाचवा हप्ता आचारसंहितेमुळे मिळाला नाही त्यांना पाचवा आणि सहावा हप्ता आता मिळणार आहे.

    या महिलांच्या खात्यावर येणार नाहीत पैसे

    ज्यांनी चार खाती उघडली आहेत, किंवा जे फसवणूक करून पैसे घेत आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. उत्पन्न अडीच लाखांहून अधिक असेल, तर लाभ मिळणार नाही. चारचाकी गाडी असेल तर लाभ मिळणार नाही. सरकारी नोकरी करणारा कुटुंबातील व्यक्ती असेल तर लाभ मिळणार नाही.

    लाभार्थी महिलांनी ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपल्या हप्त्याचं स्टेटस चेक करू शकता. तुम्ही या साईटवर मोबाईलनंबरने अकाउंट सुरू करा. त्यानंतर स्टेटस चेक करू शकता. तुम्हाला पैसे आले की नाही याबाबत माहिती मिळेल.तुमचा अर्ज बाद झाला असेल तर खात्यावर पैसे येणार नाहीत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *