- December 23, 2024
- No Comment
EPFO (ईपीएफओ) च्या कोट्यवधी सदस्यांसाठी आनंदाची बातमी, लाभ घेण्यासाठी करा हे काम, नाहीतर होईल मोठ नुकसान
ईपीएफओच्या कोट्यवधी सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक नवीन रोजगार लिंक्ड इन्सेटिव्ह (ELI) योजनेची घोषणा केली होती.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी UAN सक्रिय (Activation) आणि बँक खात्याला आधारशी जोडणे अनिवार्य आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) कोट्यवधी सदस्यांना आता आनंदवार्ता आली आहे.
आता या दोन्ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 जानेवारी, 2025 रोजीपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. ही अंतिम मुदत या दोन महिन्यात दोनदा वाढवण्यात आली. यापूर्वी 30 नोव्हेंबर, 2024 आणि 15 डिसेंबर, 2024 रोजीपर्यंत मुदत होती. ती आता पुढील 15 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) सक्रिय असणे आणि बँक खाते आधार कार्डशी जोडणे बंधनकारक केले आहे.
मंत्रालयच्या माहितीनुसार, ईपीएफओने प्रत्येक सदस्याला आधार कार्डशी युनिव्हर्सल अकाऊंट क्रमांक जोडणे आवश्यक आहे. पोर्टलवर लॉगिन सक्रिय करण्यासाठी सिंगल विंडोची सुविधा देण्यात आली आहे. त्यात पीएफ पासबुक पाहणे, डाऊनलोड करण्याची क्षमता, रक्कम काढणे यासाठी ऑनलाईन दावा करण्याची सुविधा मिळते. तुमचे प्रोफाईल अपडेट करता येते. ही प्रक्रिया अजून सुटसुटीत करता येते. आधार कार्डच्या आधारे ओटीपीच्या प्रयोगाने ही प्रक्रिया पूर्ण करता येते.
सरकार पीएफ खात्यातील योगदानासाठी सध्या असलेली 12 टक्क्यांची मर्यादा हटवण्याचा विचार करत आहे. कर्मचार्याला त्याच्या बचतीच्या सवयीनुसार पीएफ खात्यात बचतीचा पर्याय देण्यात येईल. त्यामुळे कर्मचारी त्याच्या मनाने कितीही टक्के योगदान जमा करण्यास पात्र असेल. पण त्याच्या पगारानुसार हे योगदान त्याला जमा करता येणार आहे. पगार इतके योगदान त्याला जमा करता येणार नाही.