• December 23, 2024
  • No Comment

पीएम किसान योजनेबाबत तक्रार करायची आहे? पहा जिल्हावार संपर्क यादी

पीएम किसान योजनेबाबत तक्रार करायची आहे? पहा जिल्हावार संपर्क यादी

    शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या आगामी हफ्त्याची प्रतीक्षा आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांना सोयीस्कर व्हावे म्हणून नवनवीन पर्याय उपलब्ध करून दिले जात आहे.

    ज्यामध्ये आता तक्रारीसाठी नोडल ऑफिसरचे सिंगल (Nodal Officer for complaints) पॉइंट संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत. यात राज्यानुसार किंवा जिल्ह्यानुसार वाईस सुद्धा तुम्हाला हे नंबर मिळवता येणार आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

    संपर्क यादी पुढील प्रमाणे:

    1. सर्वप्रथम पीएम किसानच्या https://pmkisan.gov.in/ या अधिकृत
    वेबसाईटवर जायचं आहे.
    2. पीएम किसान च्या पोर्टलवर आल्यानंतर सगळ्यात शेवटी असलेल्या Search
    Your Point Of Contact या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
    3. सिंगल पॉइंट कॉन्टॅक्टमध्ये गेल्यानंतर राजस्तरीय आणि जिल्हास्तरीय असे दोन
    पर्याय दिसतील.
    4. यातील राजस्तरीय नोडल ऑफिसर यामध्ये महाराष्ट्र राज्याची माहिती
    अद्ययावत नाही. मात्र जिल्हा माहिती उपलब्ध आहे.
    5. यासाठी Search District Nodal हा पर्याय निवडायचा आहे.
    6. यानंतर राज्य आणि जिल्हा निवडून सर्च या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
    7. उदाहरणार्थ आपण नाशिक जिल्हा निवडला. तर नाशिक जिल्ह्यातील उपलब्ध
    असलेल्या नोडल ऑफिसरची यादी आणि त्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध होतील.
    8. या यादीमध्ये तहसीलदार, कृषी अधिकारी उपलब्ध असतील.
    9. आता वेगवेगळ्या जिल्ह्यांना वेगवेगळे अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त
    करण्यात आलेले आहेत.
    10. आपल्याला आवश्यक तो जिल्हा निवडून तक्रारीसाठी संपर्क क्रमांक जाणून घ्यायचा आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *