• December 16, 2024
  • No Comment

उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा? अर्ज कुठे करायचा? घरबसल्या मिळवा उत्पन्नाचा दाखला, असा करा मोबाइलद्वारे अर्ज.

उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा? अर्ज कुठे करायचा?  घरबसल्या मिळवा उत्पन्नाचा दाखला, असा करा मोबाइलद्वारे अर्ज.

मुंबई: उत्पन्नाचा दाखल्या वरून उत्पन्नाची अट निश्चित करण्यात येते.आणि त्यावरून केंद्र आणि राज्य सरकारकडून ज्या विविध योजना राबवल्या जातात.त्या योजनांचा लाभ नागरिकांना घेता येतो तसेच वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ठरवून देण्यात येते. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना विविध सरकारी योजना, शिष्यवृत्तीयाचा लाभ घ्यायचा असेल तर उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागतो. हा दाखला जवळच्या तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्र किंवा आपले सरकार पोर्टलवरुन काढता येतो.

उत्पन्नाचा दाखला मिळवा ऑनलाईन:

उत्पन्नाचा दाखला किंवा मिळकत प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध होते.
आपले सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर भेट देऊन तुम्ही प्रमाणपत्र मिळवू शकता.

उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे

ओळखीचा पुरावा

पॅन कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो असणारे सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी एक कागदपत्रं, अर्जदाराचा फोटो

पत्ता दर्शवणारा पुरावा

पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पाणी बील, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, वीज बील, घरफळा पावती, सातबारा किंवा ८ अ उतारा, यापैकी एक कागदपत्रं

वैद्यकीय मदत मिळवायची असल्यास

वैद्यकीय मदत मिळवाची असेल किंवा वैद्यकीय कारणासाठी उत्पन्नाचा दाखला लागणार असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र

स्वंयघोषणापत्र

उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी स्वंयघोषणापत्र भरु द्यावं लागते. हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत भरुन द्यावं लागतं.

 

उत्पन्न दाखवणारी कागदपत्रं

प्राप्तिकर परतावा भरल्याचं प्रमाणपत्र, मंडल अधिकाऱ्याचा तपासणी अहवाल, नोकरदारांसाठी फॉर्म नंबर १६, निवृत्त पेन्शनधारकांसाठी बँक प्रमाणपत्र, अर्जदार शेतकरी असल्यास ७/१२ आणि ८ अ चा उतारा

आपले सरकार या संकेस्थळावरुन अर्ज कसा करायचा?

आपले सरकारवर या संकेस्थळावर नवीन वापरकर्ता नोंदणी या लिंकवरुन नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून तुमचं लॉगीन तयार करुन घ्या. लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्डवर विविध विभाग पाहायला मिळतील त्यातून तुम्ही महसूल विभाग निवडा. त्यातून पुढे महसूल सेवा निवडा. तिथून पुढे उत्पन्नाचा दाखला किंवा मिळकतीचे प्रमाणपत्र हा पर्याय निवडा. पुढे ओपन होणाऱ्या विंडोमध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी वाचून घ्या, त्याप्रमाणं ती तयार ठेवा कारण ती वेबसाईटवर अपलोड करावे लागते.

वेबसाईटवर जाऊन वैयक्तिक माहिती, पत्ता, किती वर्षांपासून त्या पत्त्यावर राहतो ती माहिती सादर करावी.अपलोड करायची असलेली कागदपत्रे ७५ केबी ते ५०० केबीच्या दरम्यान असावीत.सर्व कागदपत्रे अपलोड करा. फोटो आणि सही देखील अपलोड करावेत. यानंतर अर्ज सादर करावा आणि अर्जाचं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भराव. जी पावती मिळेल ती सेव्ह करुन ठेवावी.

१५ दिवसानंतर त्याच संकेतस्थळावर भेट देऊन प्रमाणपत्र मिळाले का तपासा

आपले सरकार या संकेतस्थळावर अर्ज सादर केल्यानंतर १५ दिवसांपर्यंत आपल्याला मिळकतीचे प्रमाणपत्र मिळेल. काही अडचणीमुळे प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास १५ दिवसानंतर आपले सरकारच्या संकेतस्थळावर लॉगीन करुन अपील अर्ज सादर करु शकता.

Related post

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी; आसा करा अर्ज

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌…

सर्वसामान्‍य नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…
तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमची वीजबिले कधी कल्पनेपेक्षा जास्त आली आहेत का? वीज वाचवत असूनही जास्त बिल येत असेल तर तुमच्या वीजमीटरमध्ये काहीतर गडबड किंवा…
महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *