• December 16, 2024
  • No Comment

दहशत माजवणारा सराईत जेरबंद, ; गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

दहशत माजवणारा सराईत जेरबंद, ; गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

पुणे : तरुणावर प्राणघातक हल्ला करुन फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात गुन्हे शाखा युनिट 6 पोलिसांना यश अक्षय महादेव बनसोडे, (वय 26 वर्षे, रा. संतोष मित्र मंडळ, लक्ष्मी नगर, येरवडा) पुणे असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट 6 हद्दीमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार असे युनिट हद्दीत गुन्हे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना रमेश मेमाणे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हयात पाहिजे आसलेला आरोपी हा बायफ रोड वाघोली येथे आला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्याआ ठिकाणी जावुन त्यास ताब्यात घेण्यात आले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 08/12/2024 रोजी फिर्यादीचा मुलगा घरी नसताना आरोपी व त्याचे इतर साथीदार यांनी कोयते हातात घेऊन दहशत माजवून घरात घुसून मुलगा व पत्नी यांना गंभीर दुखापत करून जखमी केलेवरून गुन्हा नोंद आहे. आरोपीस पुढील तपासाठी बिबवेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री शैलेश बलकवडे, मा.पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) 02 श्री राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक युवराज हांडे अतिरिक्त कार्यभार युनिट -6 यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, गणेश डोंगरे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.

Related post

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी; आसा करा अर्ज

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌…

सर्वसामान्‍य नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…
तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमची वीजबिले कधी कल्पनेपेक्षा जास्त आली आहेत का? वीज वाचवत असूनही जास्त बिल येत असेल तर तुमच्या वीजमीटरमध्ये काहीतर गडबड किंवा…
महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *