• December 8, 2023
  • No Comment

विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या एकाला अटक 7 लाख 58 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त

विक्रीसाठी गांजा  बाळगणाऱ्या एकाला अटक 7 लाख 58 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त

    पिंपरी :विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या एकाला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई वल्लभनगर येथील गोलमंडई येथे बुधवारी रात्री आठच्या सुमारास करण्यात आली

    जितेंद्र मगन कोळी (वय-33 रा. इसाळ, ता. शिरपुर जि. धुळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई कपिलेश कृष्णा इगवे (वय-33) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी आरोपीवर एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र कोळी हा संत तुकाराम नगर येथील मुख्य अग्निशमन केंद्रासमोर थांबला होता.
    त्याच्याजवळ गांजा असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने कोळी याला
    ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 7 लाख 43 हजार 800 रुपयांचा 7 किलो 438 ग्रॅम
    वजनाचा गांजा व 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण 7 लाख 58 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याकडे केलेल्या तपासात गांजा विक्रीसाठी आणल्याचे उघडकीस आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध सावर्डे करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *