• December 8, 2023
  • No Comment

विनापरवाना पिस्टल बाळगल्या प्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला अटक

विनापरवाना पिस्टल  बाळगल्या प्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला अटक

    पिंपरी : विनापरवाना पिस्टल बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास डांगे चौकात करण्यात आली.

    विशाल उर्फ रावण सिद्धु बनसोडे (वय-25 रा. लमाण वस्ती, खडकवासला, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार वंदु दत्तात्रय गिरी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी आरोपीवर आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    वाकड पोलीस ठाण्यातील तपास पथकाला माहिती मिळाली की, पुणे शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार पिस्टल घेऊन
    डांगे चौकात कामानिमित्त येणार आहे. पथकाने डांगे चौकात जाऊन सापळा रचला. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार
    एकजण तिथे आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले.
    त्याच्याकडे असलेल्या बॅगची अंगझडती घेतली असता दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आले. पोलिसांनी आरोपीकडून 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत. आरोपीवर यापूर्वी हवेली पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *